
श्रीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। श्रीनगर विमानतळावर शुक्रवारी नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे एक फ्लाइट पार्किंग दरम्यान एका खांबाला धडकले. विमानाचे नुकसान झाले, मात्र प्रवासी किंवा क्रू मेंबर्सपैकी कोणालाही दुखापत झाली नाही.
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने एका निवेदनात सांगितले की, फ्लाइट ६ई २२५ (व्हीटी-एनओजी) ला सकाळी ९:०२ वाजता बे नंबर ६ वर पार्क केले जात असताना, पार्किंग प्रक्रियेदरम्यान विमान व्हिज्युअल डॉकिंग गाइडन्स सिस्टम (व्हीडीजीएस) च्या खांबाला धडकले. निवेदनात सांगण्यात आले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि कोणालाही दुखापत झालेली नाही. निवेदनात पुढे सांगण्यात आले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्स मॅन्युअल पायऱ्यांचा वापर करून सुरक्षितपणे विमानातून खाली उतरले. घटनेची चौकशी निर्धारित प्रक्रियेनुसार केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घटनेची अचूक परिस्थिती आणि कारण समोर येईल. सध्या घटनेच्या कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. दरम्यान, विमानतळाचे ऑपरेशन सामान्यपणे सुरू राहिले आणि आगमन व प्रस्थान निर्धारित वेळेनुसार सुरू होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule