अमरावतीत अर्धवेळ कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेतील अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय खासदार डॉ. अनिल बोंडे साहेब व माननीय आमदार प्रवीण पोटे साहेब यांनी आज महानगरपालिकेत
अर्धवेळ कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ करण्यासाठी कार्यवाही करा


अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)

अमरावती महानगरपालिकेतील अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश माननीय खासदार डॉ. अनिल बोंडे साहेब व माननीय आमदार प्रवीण पोटे साहेब यांनी आज महानगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत दिले.

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात सेवा बजावत असून, त्यांच्या सेवाकाळाचा व कामाचा विचार करून त्यांना पूर्णवेळ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक प्रस्ताव व कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.महानगरपालिकेच्या कामकाजात या कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यांच्या सेवा-सुविधांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे व आमदार प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.यावेळी महानगरपालिकेतील विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विषयांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande