
नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सातवा दिवस असून अद्याप सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्याने आंदोलन चालूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर आज सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली होती राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय वरती हा मोर्चा काढण्यात आला.
नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी देखील त्याला प्रतिसाद म्हणून आपले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवले.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने हे आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या मोर्चामध्ये सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis