
बीड, 04 सप्टेंबर, (हिं.स.)। माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा व सबंध देशात नावाजलेला वैद्यनाथ गणेशोत्सव यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती पाहता अत्यंत साध्या पद्धतीने व केवळ श्रींच्या स्थापनेने साजरा केला जाणार असल्याचा निर्णय आ. धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
यावर्षी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने धोका दिल्याने शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता केवळ श्रींची मूर्ती स्थापन करून आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील श्री बालाजी मंदिराचा देखावा भाविकांसाठी उभारला जाणार आहे.
या मंदिर उभारणीच्या कामाचे आज युवक नेते अजय मुंडे तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी माऊली तात्या गडदे, जयपाल लाहोटी, रा. कॉ. चे शहराध्यक्ष अय्युब भाई पठाण, अजीज कच्छी, अनंत इंगळे, नाथ प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष शंकर कापसे, सचिव नितीन मामा कुलकर्णी, रवी मुळे, अमित केंद्रे, बळीराम नागरगोजे, माऊली होळंबे, सचिन मराठे, दीपक कुरील, गिरीश भोसले यांसह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis