पवित्र पोर्टलद्वारे राज्यात १३ हजार शिक्षकांची भरती
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे तब्बल १३ हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या भरतीमुळे शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील सुमारे ८ हजार एकशिक्षकी शा
school


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे तब्बल १३ हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या भरतीमुळे शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील सुमारे ८ हजार एकशिक्षकी शाळांपैकी काही शाळांनाही अतिरिक्त शिक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये सध्या केवळ एका शिक्षकावर संपूर्ण वर्गांच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, शैक्षणिक गुणवत्ता राखताना संबंधित शिक्षकांवरही अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.नव्याने करण्यात आलेल्या शिक्षक भरतीत शिक्षकांची सर्वाधिक गरज असलेल्या शाळांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः एकशिक्षकी शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना नियमित आणि प्रभावी अध्यापन मिळण्यास मदत होईल.या भरतीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande