पुण्यातील ३८ ब्लॅक स्पॉटवर तातडीने उपाययोजना; महापालिकेशी समन्वय साधणार
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी, नऱ्हे, बाणेर, मांजरीसह १४ वाहतूक विभागांच्या हद्दीतील ३८ ब्लॅक स्पॉटवर यंदाच्या पहिल्या आठ महिन्यांत तब्बल १८५ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात अवजड वाहनांमुळे झा
CP Pune


पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी, नऱ्हे, बाणेर, मांजरीसह १४ वाहतूक विभागांच्या हद्दीतील ३८ ब्लॅक स्पॉटवर यंदाच्या पहिल्या आठ महिन्यांत तब्बल १८५ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात अवजड वाहनांमुळे झाल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले आहे. अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील ही ३८ अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली असून, तेथे तातडीने उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी वाहतूक नियमन अधिक प्रभावी करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील १४ वाहतूक विभागांच्या प्रमुखांची विशेष बैठक घेतली.

संबंधित विभागांमधील अपघातप्रवण ठिकाणांची माहिती घेऊन ब्लॅक स्पॉटवर वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ब्लॅक स्पॉटवर पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात येणार असून, अवजड वाहनांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिस्थितीनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, केवळ पोलिसांकडून वाहतूक नियमन करून अपघातांची समस्या पूर्णपणे सुटणार नसल्याने पुढील टप्प्यात पुणे महापालिकेशी समन्वय साधून ब्लॅक स्पॉटवर आवश्यक अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा विषयक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक बदल सुचविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande