सोलापूर : जिल्ह्यात कुठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या - जिल्हाधिकारी
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत केवळ १८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्यास चारा टंचाईची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने तालुका, मंडळ आणि गावनिहाय चारा उपलब्धतेचे काटेकोर नि
Collctor


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत केवळ १८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्यास चारा टंचाईची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने तालुका, मंडळ आणि गावनिहाय चारा उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे. चारा बियाण्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून अतिरिक्त १ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात येत असून, जिल्ह्यात कुठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा, खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत पुढील तीन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. इतर तालुक्यांत चार ते पाच महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, पुढील परिस्थितीचा विचार करून पशुसंवर्धन विभागाने कृषी विभागाच्या तालुकानिहाय अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून तालुका, मंडळ आणि गावनिहाय चारा उपलब्धतेची अद्ययावत माहिती आठ दिवसांत तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.चारा बियाण्यांसाठी नियोजन समितीतून तातडीने १ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार आणखी निधीची मागणी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande