सोलापूरला ‘आयटी डेस्टिनेशन’ बनवण्यासाठी मंत्रालयीन हालचालींना वेग
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर शहराला महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आयटी डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व सांस्कृति
IT Park


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।

सोलापूर शहराला महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आयटी डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर अर्थात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होणार आहे. सोलापूरच्या आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, गुंतवणूक, रोजगार आणि धोरणात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

मार्च २०२६ मध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर आयटी असोसिएशनने शहरातील आयटी क्षेत्राच्या विकासासाठी विविध मागण्या मांडल्या होत्या. स्थानिक आयटी उद्योगाला चालना देणे, धोरणात्मक सुधारणा करणे आणि सोलापूरला आयटी क्षेत्रातील नवीन केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत असोसिएशनने भूमिका मांडली होती.

या मागण्यांच्या पुढील टप्प्यात आता थेट मंत्रालयीन पातळीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या आयटी क्षेत्राच्या विकासाला प्रत्यक्षात किती गती मिळते, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande