
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर क्राइम पत्रकार संघाच्या २०२६-२७ या वर्षासाठी नवराष्ट्रचे विशाल भांगे यांची अध्यक्षपदी, रवींद्र मस्के यांची खजिनदारपदी आणि परशुराम कोकणे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी पत्रकार विनायक होटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
प्रारंभी लोकमतचे आप्पासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पुण्यनगरीचे भरतकुमार मोरे, कटूसत्यचे पांडुरंग सुरवसे यांच्यासह पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली. क्राइम पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत करण्याबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विजयकुमार बाबर, इरफान शेख, विश्वभूषण लिमये आणि योगेश तुरेराव, तर कार्याध्यक्षपदी अश्विनी तडवळकर आणि आप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी शहानवाज शेख आणि इब्राहीम मुजावर, तर सहखजिनदारपदी लक्ष्मीकांत शिंदे आणि दिनेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रसिद्धीप्रमुखपदी तौसिफ शेख, प्रमोद तुपसमुद्रे आणि यासिन शेख यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून सूर्यकांत आसबे, शिवाजी सुरवसे, विनायक होटकर, उमाकांत चौडे, भरतकुमार मोरे, वैभव गंगणे, दिगंबर इप्पलपल्ली, इम्रान सगरी, विनोद कामतकर आणि रोहन नंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली.
सल्लागारपदी अविनाश कुलकर्णी, राजकुमार नरूटे, भगवान परळीकर, संजय येऊलकर आणि पांडुरंग सुरवसे, तर विधी सल्लागारपदी अॅड. प्रदीपसिंह रजपूत आणि अॅड. संतोष न्हावकर यांची नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला सागर सुरवसे, आफताब शेख, अभिषेक आदेप्पा, विक्रांत कालेकर, गौसपाक पटेल, अनिकेत गायकवाड, राहुल रणदिवे, संतोष कासे, रवि ढोबळे, राजकुमार पवार, चंदन बोल्लू, सौरभ वाघमारे, जागृत रणदिवे, अकबर बागवान, नागेश चिप्पा, फय्याज शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड