नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षाच्या राजकीय आणि त्यांची आज गप्पांची मैफिल रंगली
नांदेड, 05 सप्टेंबर (हिं.स.)। कामाच्या कितीही व्यस्त धावपळीतून वेळ काढला, तरी राजकीय सहकाऱ्यांसोबत चहा-नाश्त्यावर रंगणाऱ्या गप्पांची मज्जाच काही वेगळी असते. आज काबरा नगरच्या प्रसिद्ध ''अभिराम इडली सेंटर''वर असाच एक निवांत आणि हसरा कट्टा जमला ह
अ


नांदेड, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

कामाच्या कितीही व्यस्त धावपळीतून वेळ काढला, तरी राजकीय सहकाऱ्यांसोबत चहा-नाश्त्यावर रंगणाऱ्या गप्पांची मज्जाच काही वेगळी असते.

आज काबरा नगरच्या प्रसिद्ध 'अभिराम इडली सेंटर'वर असाच एक निवांत आणि हसरा कट्टा जमला होता.

प्रसन्न वातावरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजुरकर यांनी इडलीचा आस्वाद घेत सर्व सहकाऱ्यांसोबत अनेक मजेच्या आणि वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.

यावेळी खासदार अजित गोपछडे आमदार बालाजी कल्याणकर नगरसेवक सुनील नेरलकर, मिलिंद देशमुख, संतोष मुळे, भार्गव सर आणि इतर सर्व जवळचे स्नेही-सहकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande