नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृतदौड' संपन्न
नांदेड, 05 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या अमृत महोत्सवानिमित्त कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालय (नांदेड), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''
अ


नांदेड, 05 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या अमृत महोत्सवानिमित्त कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालय (नांदेड), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अमृतदौड' जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण प्रसंगी भाजप आमदार अमरनाथ राजूरकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि तरुणाईला खेळाकडे आकर्षित करणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांनी व खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी प्रामुख्याने खासदार अजित गोपछडे जी, आमदार बालाजी कल्याणकर जी, मा. प्रदेश उपाध्यक्ष श्री. चैतन्य बापू देशमुख जी, महापौर सौ. कविताताई मुळे, श्री. संतोषजी मुळे, मा. भार्गव सर, नगरसेवक श्री. मिलिंद देशमुख, नगरसेवक श्री. सुनील नेरळकर, तसेच उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande