अंजनगाव सुर्जीत ५.७२ लाखांच्या मुद्देमालासह वाहन जप्त, तिघे ताब्यात
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी व शेती साहित्याच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकरखेडा नाका येथे रचलेल्या
अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडक कारवाई ५.७२ लाखांच्या मुद्देमालासह टाटा ४०७ वाहन जप्त


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी व शेती साहित्याच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमे दरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे टाकरखेडा नाका येथे रचलेल्या सापळ्यात चोरीचे साहित्य वाहून नेणारे टाटा ४०७ वाहन पकडण्यात आले असून, ५ लाख ७२ हजार ५८० रुपये किमतीच्या मुद्देमालासह ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती नुसार टाकरखेड नाका, अंजनगाव सुर्जी येथे नाकाबंदी दरम्यान संशयास्पद टाटा ४०७ वाहनाची तपासणी करून चोरीचा साठा जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेले आरोपी मोहम्मद सुफियान अब्दुल कादिर (वय २५): रा. काझीपुरा, अंजनगाव सुर्जी (चालक),मोहम्मद साजीद ताज मोहम्मद (वय ४५): रा. काझीपुरा,अंजनगाव सुर्जी (भांड्याचे व्यापारी), शेख समीर शेख बशीर (वय २४): रा. सत्तीपुरा, अंजनगाव सुर्जी माल विकणारा मुख्य आरोपी सहीत सर्व आरोपींना अटक करण्यात आली.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकुण साहित्याचा तपशील वजन प्रमाण अंदाजे किंमत पैकी टाटा ४०७ क्र. एम एच ०४ डी के ९०८८ सहीत एकुण ५,७२,५८० रुपयांचा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला.

या धडक कारवाईमुळे महावितरण कंपनी आणि शेती साहित्याच्या केबल चोरीचे प्रलंबित गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित केबल चोरीचे आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस त्या दृष्टीने पुढील सखोल तपास करत आहेत. ही कार्यवाही अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल हुड यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल चांदोरे, पोउपनि भारत चिरडे, पोउपनि विशाल पोळ तसेच पोलीस अंमलदार रवी राठोड, आकाश रंगारी, अमित घाटे आणि मोहसिन पठाण यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande