
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
भारतामध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत २०२५-२६ मधील बेस्ट परफॉर्मिंग सिटीज अंतर्गत सीपीसीबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत, तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या कॅटेगरी मधील पारितोषिक अमरावती महापालिकेस जाहीर झाले आहे असून, यासंदर्भातील पत्र मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांना प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार मनपाद्वारे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा परिणाम असून, सोमवारी ७ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री पर्यावरण, वन व वातारवरणीय बदल यांच्या हस्ते स्वच्छ वायु दिनाला दिल्ली येथे तो प्रदान करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी