
छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम आणि सकारात्मक वातावरण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या एसबीआर स्टडी पार्क अभ्यासिका, शाखा क्र.३चा शुभारंभ सोहळा राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. छत्रपती संभाजी नगर शहरासह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा फायदा होणार आहे. अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळते. स्पर्धा परीक्षांसह विविध शैक्षणिक उद्दिष्टांसाठी एकाग्रतेने तयारी करण्यास अशा सुविधांची मोठी मदत होते असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis