धाराशिव : नळदुर्गच्या ऐतिहासिक वैभवाला मिळणार नवी झळाळी
धाराशिव, 05 सप्टेंबर (हिं.स.)। धाराशिवच्या मातीत शतकांपासून दिमाखात उभा असलेला आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जाणारा ‘नळदुर्ग’ आता एका नव्या रूपात जगासमोर येत आहे. चालुक्य, बहामनी आणि आदिलशाहीच्या काळात ‘शहादुर्ग’ म्हणून
धाराशिव : नळदुर्गच्या ऐतिहासिक वैभवाला मिळणार नवी झळाळी


धाराशिव, 05 सप्टेंबर (हिं.स.)। धाराशिवच्या मातीत शतकांपासून दिमाखात उभा असलेला आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जाणारा ‘नळदुर्ग’ आता एका नव्या रूपात जगासमोर येत आहे. चालुक्य, बहामनी आणि आदिलशाहीच्या काळात ‘शहादुर्ग’ म्हणून नावारूपाला आलेला हा दुर्ग आणि येथील अद्भुत ‘पाणी महल’ आपल्या पूर्वजांच्या अद्वितीय स्थापत्यकलेची साक्ष देतात.

शेकडो वर्षांचा वैभवशाली वारसा आपल्या अंगाखांद्यावर जपणारा नळदुर्ग किल्ला आता जतन, संवर्धन आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करतोय. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन, तटबंदी आणि बुरुजांचं बळकटीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटन विकासासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या किल्ल्याच्या विकासा सोबतच धाराशिवच्या पर्यटनाला गती देणारा, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा आणि आपल्या इतिहासाला जगाच्या नकाशावर नेणारा संकल्प आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande