
बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
बीड शहरात औषधी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. काळा हनुमान चौक परिसरात सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून अंमली पदार्थ सदृश्य औषधांच्या 160 सीलबंद बाटल्या आणि स्कुटी असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या बाटल्यांची अंदाजे किंमत 40 हजार रुपये असून, स्कुटीची किंमत 75 हजार रुपये आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव अफताब सलीम खान पठाण (वय 28, रा. दाऊदपुरा, पेठ बीड) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis