प्रियांका चोप्रा जोनस पॅरिसमधील LVMH PRIZE मध्ये कार्ल लगरफेल्ड प्राईज करणार प्रदान
मुंबई, 05 सप्टेंबर (हिं.स.)। पॅरिस आणखी एका मोठ्या फॅशन क्षणासाठी सज्ज होत असताना ग्लोबल आइकॉन प्रियांका चोप्रा जोनस त्याचा याच्या अगदी केंद्रस्थानी असणार आहे. ग्लोबल आइकॉन यंदाच्या LVMH Prize सोहळ्यात प्रतिष्ठित Karl Lagerfeld Prize प्रदान करणार अ
Priyanka


मुंबई, 05 सप्टेंबर (हिं.स.)। पॅरिस आणखी एका मोठ्या फॅशन क्षणासाठी सज्ज होत असताना ग्लोबल आइकॉन प्रियांका चोप्रा जोनस त्याचा याच्या अगदी केंद्रस्थानी असणार आहे. ग्लोबल आइकॉन यंदाच्या LVMH Prize सोहळ्यात प्रतिष्ठित Karl Lagerfeld Prize प्रदान करणार असून ती हॉलिवूड स्टार जेनिफर लॉरेन्स आणि थाई अभिनेत्री Urassaya ‘Yaya’ Sperbund यांच्यासोबत सादरकर्त्यांच्या यादीत सहभागी होणार आहे.

Dior ambassadors Jennifer Lawrence आणि Priyanka Chopra Jonas यांच्यासोबत Louis Vuitton ची face असलेली Urassaya “Yaya” Sperbund या Fondation Louis Vuitton येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

या सोहळ्यात फॅशनमधील नव्या पिढीतील प्रतिभेचा गौरव केला जातो. ज्यामध्ये नऊ नवीन उदयोन्मुख डिझायनर्स तीन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी स्पर्धा करणार आहेत.

हा क्षण प्रियांकाच्या सतत विस्तारत असलेल्या ग्लोबल फॅशन कैलेंडर मध्ये महत्त्वपूर्ण ठरतोय. Dior ambassador आणि international fashion circuit वरील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून, Priyanka फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचांशी जोडली गेली आहे, पॅरिसमधील haute couture front rows पासून जगभरातील प्रमुख luxury moments पर्यंत. तिच्या उपस्थितीची चर्चा नियमितपणे जगभरात होते, त्यामुळे LVMH Prize मध्ये तिची उपस्थिती ही fashion, luxury आणि pop culture वरील तिच्या प्रभावाचा स्वाभाविक विस्तार ठरते.

प्रियांका सारखी अभिनेत्री एवढ्या बड्या फॅशन इवेंटसाठी सादरकर्त्यांच्या यादीचे नेतृत्व करत असल्याने ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande