छ. संभाजीनगर - शहराचे नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी स्थायी समितीत महत्त्वपूर्ण चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा संपन्न झाली. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध नागरी व प्रशासकीय विषयांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील मोठ्या रुग्णालये व ह
अ


छत्रपती संभाजीनगर, 05 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा संपन्न झाली. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध नागरी व प्रशासकीय विषयांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

शहरातील मोठ्या रुग्णालये व हॉटेल्सचे फायर ऑडिट, महानगरपालिकेच्या विविध विभागांचे लेखापरीक्षण तसेच आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हातगाडीधारकांसाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि हातगाडीधारकांची उपजीविका या तिन्ही बाबींचा समतोल साधत योग्य निर्णय घेण्यावर भर देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande