चिखलदरा कलाल कुंडात शिक्षक बुडाला
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)। पर्यटननगरी चिखलदरा येथील धोकादायक समजल्या जाणाऱ्या कलाल कुंडात अमरावती येथील युवा शिक्षक बुडाल्याची घटना गुरुवारी घडली. विपीन कोरे (३५) असे त्यांचे नाव आहे. माहितीनुसार, ते अमरावती येथील बिरला ओपन माइंड स्कूलमध्ये नृ
चिखलदरा कलाल कुंडात शिक्षक बुडाला


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

पर्यटननगरी चिखलदरा येथील धोकादायक समजल्या जाणाऱ्या कलाल कुंडात अमरावती येथील युवा शिक्षक बुडाल्याची घटना गुरुवारी घडली. विपीन कोरे (३५) असे त्यांचे नाव आहे. माहितीनुसार, ते अमरावती येथील बिरला ओपन माइंड स्कूलमध्ये नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

विपीन हे आपले सहकारी प्रणय गोरे यांच्यासोबत चिखलदरा येथे पर्यटनासाठी आले होते. घटनेची माहिती चिखलदरा पोलिसांना दिल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. कलाल कुंडाची खोली आणि परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता बचावकार्य आव्हानात्मक ठरले. अमरावती आणि नागपूर येथून एनडीआरएफ पथक पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम राबविली. पण, अंधार वाढल्यानंतर त्यांना बचावकार्य थांबवावे लागले.आज सकाळी परत शोध कार्य सुरु करण्यात आले त्यानंतर विपीन यांचा मृतदेह बचाव पथकाला आढळला .

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande