अमरावतीत लाच घेणारे तिघे एसीबीच्या जाळ्यात
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.) धारणी येथील शासकीय इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहायक दुय्यम निबंधक संतोष दुधंडे, लकी सुनील आणि खासगी इसम साबूलाल भिलावेकर २९ यांना एका आदिवासीकडून ४ हजार ८०० रुपये घेताना अटक करण्यात आली. सेंट्रल बँक
लाच घेणारे तिघे एसीबीच्या जाळ्यात


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)

धारणी येथील शासकीय इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहायक दुय्यम निबंधक संतोष दुधंडे, लकी सुनील आणि खासगी इसम साबूलाल भिलावेकर २९ यांना एका आदिवासीकडून ४ हजार ८०० रुपये घेताना अटक करण्यात आली.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया धारणी शाखेकडून पीक कर्ज घेण्यासाठी इतर सदस्यांची सहमती घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी पत्र रजिस्टर्ड करायचे होते. कुसुमकोट येथील ऑनलाईन सेंटरच्या संचालकाने दुय्यम निबंधक कार्यालयातील दोघांना हाताशी धरून लग्गा लावला. ४८०० रुपयांमध्ये बोलणी झाली. मात्र शेतकऱ्याने लाच प्रतिबंधक विभागाला गुपचुपपणे या प्रकरणाची तक्रार दिली होती.

या कारवाईत पोलिस अधीक्षक बापू बांगरे, सुनील किनगे, सापळा अधिकारी चित्रा मेसर, पो. नि. संजय शिंदे आणि सहकारी सहभागी झाले होते.

गेल्या आठवड्यात मंडळ अधिकारी कुमरे यांना खनिज संपत्तीची चोरी लपवण्यासाठी लाच घेताना पकडण्यात आलेले होते. विशेष असे की, १० वर्षांपूर्वी धारणीच्या दुय्यम निबंधकाला सुद्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.

------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande