पुण्यात पुन्हा रंगणार डीजेमुक्त दहीहंडीचा जल्लोष; लाल महाल चौकात संयुक्त सोहळा
पुणे, 05 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून द
ganapti


पुणे, 05 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या सोहळ्यात सहभागी करून घेत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पुनीत बालन ग्रुपने गतवर्षी डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करून महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती. त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी तसेच डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे.

यंदाच्या दहीहंडी सोहळ्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरासह ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण, हलगी आणि मर्दानी खेळांचे प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणून या संयुक्त दहीहंडी सोहळ्याकडे पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande