सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश; पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास बंदी
सोलापूर, 05 सप्टेंबर, (हिं.स.)। सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते २१ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्य
Cp


सोलापूर, 05 सप्टेंबर, (हिं.स.)। सोलापूर शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ७ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते २१ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम ३७ (१) व (२) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, अशा प्रकारच्या कृत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

मनाई आदेशाच्या कालावधीत शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, काठ्या, लाठ्या, चाकू तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आहे. परवानाधारक बंदुकीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची विशिष्ट परवानगी घेतल्यास त्यास संबंधित नियमांनुसार सूट राहणार आहे.

तसेच स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्यासाठी वापरता येणारी उपकरणे वाहून नेणे, जमा करणे किंवा तयार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

व्यक्ती, प्रेत, आकृती किंवा पुतळ्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे उच्चार, गाणी अथवा संगीत वाजविण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

शालीनता व शिष्टाचाराला बाधा आणणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शित करणे अथवा प्रसारित करणे; तसेच ज्यामुळे सामाजिक नैतिकता किंवा सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते अथवा राज्यव्यवस्थेविरुद्ध वातावरण निर्माण होऊ शकते, अशा कृतींनाही मनाई करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande