श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेला ब्रुसेल्स डायमंड लीगचे विजेतेपद
ब्रुसेल्स (बेल्जियम), 06 सप्टेंबर (हिं.स.) श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने ८९.०४ मीटरच्या भालाफेकीसह ब्रुसेल्स डायमंड लीग २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला श्रीलंकन भालाफेकपटू ठरला आहे. या हंगामातील पाथिरागेचे हे दुसरे मो
रुमेश थरंगा पाथिरागे


ब्रुसेल्स (बेल्जियम), 06 सप्टेंबर (हिं.स.) श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने ८९.०४ मीटरच्या भालाफेकीसह ब्रुसेल्स डायमंड लीग २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला श्रीलंकन भालाफेकपटू ठरला आहे. या हंगामातील पाथिरागेचे हे दुसरे मोठे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने ग्लासगो येथे झालेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे या लीगमध्ये सहभागी होऊ शकला नाही. जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही तो बाहेर पडला आहे. डायमंड लीगमधील विजयामुळे रुमेशने अल्टिमेट चॅम्पियनशिपसाठी थेट पात्रता मिळवली आहे.

पाथिरागेने यावर्षी डायमंड लीग स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. अंतिम फेरीत मिळालेल्या पहिल्या संधीत त्याने सुरुवातीला ८०.४२ मीटर आणि ७९.७३ मीटर अशा दोन सामान्य भालाफेकी केल्या. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.०४ मीटरची भालाफेक करून आघाडी घेतली आणि आपली खरी क्षमता दाखवली. हा थ्रो त्याच्या विजयाचा पाया ठरला. पोलंडच्या डेव्हिड वॅग्नरने ८७.४७ मीटरच्या नव्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. विश्वविजेता केशॉर्न वॉलकॉटने ८३.९९ मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह तिसरे स्थान मिळवले.

नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाथिरागेचा सामना ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम, राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता यशवीर सिंग आणि रोहित यादव यांच्यासारख्या खेळाडूंशी होईल. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेची पात्रता फेरी २६ सप्टेंबर रोजी, तर अंतिम फेरी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande