बुरुड समाजाच्या विकासासाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक स्वावलंबन गरजेचे
कर्जत येथे विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा उत्साहात रायगड, ६ सप्टेंबर (हिं.स.)। कर्जत-खालापूर: बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य देत समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे,
बुरुड समाजाच्या प्रगतीसाठी संघटनशक्ती बळकट करण्याचे आवाहन: आबासाहेब पवार


बुरुड समाजाच्या प्रगतीसाठी संघटनशक्ती बळकट करण्याचे आवाहन: आबासाहेब पवार


कर्जत येथे विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा उत्साहात

रायगड, ६ सप्टेंबर (हिं.स.)। कर्जत-खालापूर: बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य देत समाजबांधवांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे, असा सूर अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यात उमटला.कर्जत-दहिवली येथील साई मंदिर, इंदिरानगर येथे सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने बुरुड समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा-२०२६ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शाळेच्या बॅगा व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा छत्री देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करणे आणि सामाजिक उपक्रमांना चालना देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी अशोक खैरे यांच्या माध्यमातून बांबू वृक्षारोपणाचाही उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पवार, विश्वस्त अशोक पवार, महासचिव प्रकाश माने, खजिनदार राजेंद्र नागे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.पालघर येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नववीपासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुढे आयपीएस, आयएएस यांसारख्या प्रशासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमासाठी सज्जन जमदरे व त्यांच्या सहकाऱ्यांसह संस्थापक निलेश सांबरे यांनी विशेष योगदान दिले.मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करावी, तसेच समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande