छ.संभाजीनगर : 62 महसूल मंडळांमध्ये 10, 11, 12, 15, 16 सप्टेंबर रोजी शिबिरांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)।जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांचे आयोजनकुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात
छ.संभाजीनगर : 62 महसूल मंडळांमध्ये 10, 11, 12, 15, 16 सप्टेंबर रोजी शिबिरांचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)।जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांचे आयोजनकुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात 10 ते 17 सप्टेंबर, 2026 या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण 62 शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जालना तालुक्यात 10 शिबिर तर बदनापूर मध्ये 6, अंबड मध्ये 9, घनसावंगी मध्ये 8, परतूर मध्ये 6, मंठा मध्ये 6, भोकरदन मध्ये 11 आणि जाफराबाद मध्ये 6 असे एकूण 62 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 62 महसूल मंडळांमध्ये दि.10, 11, 12, 15 व 16 सप्टेंबर 2026 रोजी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये 10 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील देवमुर्ती आणि सांगवी तलाव या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील बदनापुर, अंबड तालुक्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव आणि राणी उंचेगाव, परतुर तालुक्यातील आष्टी, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी, भोकरदन तालुक्यातील आन्वा, दानापुर, पिंपळगाव रेणुकाई आणि जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे शिबिरे होणार आहेत. तसेच 11 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील नेर आणि शेवली या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील बावणे पांगरी, अंबड तालुक्यातील शहागड आणि वडीगोद्री, घनसावंगी तालुक्यातील रांजणी आणि पानेवाडी, परतुर तालुक्यातील श्रीष्टी, मंठा तालुक्यातील तळणी ढोकसाळ, भोकरदन तालुक्यातील धावडा, भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव येथे शिबिरे होणार आहेत. 12 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील वाघुळ जहागीर आणि गोलापांगरी या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील रोशनगाव आणि शेलगाव, अंबड तालुक्यातील ताडहदगाव आणि गोंदी, घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी आणि जांब समर्थ, परतुर तालुक्यातील वाटुर, मंठा तालुक्यातील मंठा, भोकरदन तालुक्यातील राजुर, जानेफळ दाभाडी आणि जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे शिबिरे होणार आहेत. 15 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील रामनगर, विरेगाव, जालना या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील चिखली, अंबड तालुक्यातील सुखापुरी, रोहिलागड, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी, परतुर तालुक्यातील सातोना खुर्द, कोकाटे हदगाव मंठा तालुक्यातील माळतोंडी, भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, आव्हाना आणि जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद येथे शिबिरे होणार आहेत. तसेच 16 सप्टेंबर, 2026 रोजी जालना तालूक्यातील पाचनवडगाव या मंडळात तर बदनापुर तालूक्यातील दाभाडी, अंबड तालुक्यातील जामखेड, धनगरपिंप्री, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, परतुर तालुक्यातील परतुर मंठा तालुक्यातील जयपुर, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, सिपोरा बाजार आणि जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी, वरुड बु. या मंडळात शिबिरे होणार आहेत.

या शिबिरांमध्ये नागरिकांना कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदी शोधणे, पुराव्यांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे आणि पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande