राष्ट्रनिर्माणाच्या संदेशातून डोंबिवलीत रंगला 'डोंबिवलीचा मानबिंदू' दहीहंडी उत्सव
- नवयुग गोविंदा पथकाने भाजपा डोंबिवलीची मानाची दहीहंडी फोडली - ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ ही यंदाची संकल्पना मांडली - १९ व्या वर्षात दहीहंडी उत्सवाचे पदार्पण डोंबिवली, 6 सप्टेंबर (हिं.स.) : डोंबिवलीच्या मध्यवर्ती बाजी प्रभू चौकात भाजपा कल्याण
दहीहंडी गोविंदा पथक


दहीहंडी गोविंदा पथक


दहीहंडी गोविंदा पथक


दहीहंडी गोविंदा पथक


- नवयुग गोविंदा पथकाने भाजपा डोंबिवलीची मानाची दहीहंडी फोडली

- ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ ही यंदाची संकल्पना मांडली

- १९ व्या वर्षात दहीहंडी उत्सवाचे पदार्पण

डोंबिवली, 6 सप्टेंबर (हिं.स.) : डोंबिवलीच्या मध्यवर्ती बाजी प्रभू चौकात भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी उत्सव’ यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. दहीहंडी फोडण्यासाठी अष्टविनायक गोविंदा पथक, नवयुग गोविंदा पथक आणि नवसाई गोविंदा पथक या पथकांमध्ये लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीद्वारे हंडी फोडण्याचा मान नवयुग गोविंदा पथकाला मिळाला.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात कल्याण-डोंबिवलीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.

गेली १९ वर्षे डोंबिवलीकर हा दहीहंडी उत्सव अनुभवत आहेत. दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताचे संदेश देणारी दहीहंडी म्हणून भाजपा कल्याण जिल्ह्याच्या या दहीहंडीची विशेष ओळख निर्माण झाली आहे. यंदा ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ ही संकल्पना घेऊन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, एकजुटीने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संदेश यानिमित्ताने रवींद्र चव्हाण यांनी दिला.

'गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य' हे डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य आहे. गोविंदा पथके हंडी फोडताना किंवा सलामी देताना मानवी मनोऱ्यातील सर्वांत वरील दोन थरांतील गोविंदांना पाठीला हार्नेस लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे उंच थरांवरील गोविंदांना अतिरिक्त सुरक्षा कवच मिळते. सहभागी सर्व गोविंदा पथकांचा तसेच गोविंदा पथकांच्या आयोजकांचाही विमा काढण्यात येतो. उत्सवस्थळापासून १ किलोमीटरच्या परिघात गोविंदांसोबत कोणतीही दुर्घटना घडल्यास विम्याच्या माध्यमातून त्यांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेणारी दहीहंडी म्हणून या उत्सवाची गोविंदा पथकांमध्ये विशेष ओळख निर्माण झाली आहे.

या उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रियालिटी शोमध्ये आपली कला सादर केलेल्या कलाकारांचे विशेष सादरीकरण. कृष्णनगरी मथुरा येथील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा दोन वेळा फायनलिस्ट ठरलेला ‘क्रेझी हॉपर्स’ ग्रुप तसेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या पाचव्या आणि सहाव्या पर्वातील फायनलिस्ट असलेल्या कोलकात्याच्या ‘बीट ब्रेकर्स’ ग्रुपने आपल्या कलाविष्कारातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय विविध टीव्ही शोमध्ये आपल्या नृत्यकलेची छाप पाडणाऱ्या ‘आरडी रॉकर्स’ आणि ‘जीआर ग्रुप’ यांच्या सादरीकरणानेही उत्सवाची रंगत वाढवली.

देशभरातील नामांकित कलाकारांसोबतच कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याची परंपराही यंदा कायम ठेवण्यात आली. योगेश पाटकर यांचा ‘डोंबिवलीकर पेसमेकर्स’ ग्रुप, गणेश बासुगडे यांचा ‘बॉलिवूड डान्स फॅक्टरी’, सचिन बिर्जे यांचा ‘डोंबिवली स्पायडर डान्स स्टुडिओ’, डोंबिवलीकर हूपर गर्ल हेजल पंड्या तसेच तुषार मोरे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक यामुळे स्थानिक कलावंतांच्या कलेला मोठे व्यासपीठ मिळाले.

दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताचे संदेश देणारी दहीहंडी म्हणून भाजपा कल्याण जिल्ह्याच्या या दहीहंडीची विशेष ओळख निर्माण झाली आहे. यंदा ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ ही संकल्पना घेऊन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता 'डोंबिवलीचा मानबिंदू' दहीहंडी उत्सव हा सामाजिक भान आणि राष्ट्रहिताची जाणीव जागवणारा उत्सव ठरला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्ती, गोविंदांची सुरक्षितता आणि स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन यांचा सुंदर संगम साधणारा ‘डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी उत्सव डोंबिवलीकरांच्या

सदैव स्मरणात राहिल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande