जावा 42 बॉबर ‘ऑल स्टार्स’ एडिशन लाँच
मुंबई, 06 सप्टेंबर (हिं.स.)। क्लासिक लेजंड्सच्या अंतर्गत येणाऱ्या जावा येझदी मोटरसायकल्सने आपल्या ‘ऑल स्टार्स’ मालिकेतील दुसरे मॉडेल जावा 42 बॉबर ऑल स्टार्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ‘ग्लोबल चे
Jawa 42 Bobber ‘All Stars’ Edition Launched


मुंबई, 06 सप्टेंबर (हिं.स.)। क्लासिक लेजंड्सच्या अंतर्गत येणाऱ्या जावा येझदी मोटरसायकल्सने आपल्या ‘ऑल स्टार्स’ मालिकेतील दुसरे मॉडेल जावा 42 बॉबर ऑल स्टार्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ‘ग्लोबल चेस लीग 2026’दरम्यान या विशेष आवृत्तीचे अनावरण केले. या नव्या बॉबरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.09 लाख रुपये असून, स्टँडर्ड जावा 42 बॉबरच्या तुलनेत तिच्या तांत्रिक रचनेत मोठा बदल करण्यात आलेला नाही. मात्र, स्टायलिंग, रंगसंगती, ग्राफिक्स आणि डिटेलिंगमध्ये आकर्षक बदल करण्यात आले आहेत.

जावा 42 बॉबर ऑल स्टार्स एडिशन ही यापूर्वी सादर करण्यात आलेल्या जावा 42 एफजे ऑल स्टार्सनंतर या मालिकेतील दुसरी मोटरसायकल आहे. कंपनीने या मालिकेच्या माध्यमातून रायडर्सचा व्यक्तिमत्त्वपूर्ण दृष्टिकोन, ॲटिट्यूड आणि धैर्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या 42 बॉबरमध्ये चेकरबोर्ड ग्राफिक्स, ‘ऑल स्टार्स’ बॅजिंग आणि विशेष रंगसंगती देण्यात आली आहे. ‘ग्लोबल चेस लीग’मध्ये अनावरण झाल्यामुळे या मोटरसायकलच्या डिझाइनचा बुद्धिबळाशीही संबंध जोडण्यात आला आहे.

ही मोटरसायकल ब्लॅक मिरर, शॅडो ब्लॅक, सिल्व्हर नाइट, जेस्पर रेड आणि मिस्टिक कॉपर अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. सिल्व्हर नाइट रंगाच्या एका प्रकारात चेकरबोर्ड थीम फिनिशही देण्यात आली आहे. विशेषतः शॅडो ब्लॅक व्हेरिएंटला मॅट-ब्लॅक फिनिश आणि फ्लोटिंग सीटमुळे वेगळा लूक मिळतो. या मोटरसायकलची किंमत व्हेरिएंटनुसार 2,08,942 रुपयांपासून 2,19,942 रुपयांपर्यंत आहे.

तांत्रिकदृष्ट्या या बॉबरमध्ये 334 सीसीचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,500 आरपीएमवर 29 एचपी पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 30.01 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनला सहा-स्पीड गिअरबॉक्स आणि इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शनची जोड आहे. यात डबल-क्रॅडल फ्रेम, 35 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि गॅस-चार्ज्ड रिअर मोनोशॉक देण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी 280 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रिअर डिस्कसह ड्युअल-चॅनेल एबीएस देण्यात आले आहे. 740 मिमी सीट उंची, 145 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, 12.5 लिटर इंधन टाकी आणि 177 किलो कर्ब वजन अशी या बाइकची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande