छ. संभाजीनगर - लोहारा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात
छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। लोहारा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रवीण स्वामी यांनी जेवळी, विलासपूर-पांढरी, बेडकाळ व मार्डी परिसरातील शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यां
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। लोहारा तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिके संकटात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रवीण स्वामी यांनी जेवळी, विलासपूर-पांढरी, बेडकाळ व मार्डी परिसरातील शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जेवळी व विलासपूर-पांढरी येथे व्ही. के. कांबळे सर व राजू चव्हाण यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाने तातडीने गावनिहाय सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, तलाठी, कृषी सहाय्यक आणि स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande