लातूर - जिल्हा पतसंस्था संघावर १९ संचालकांची बिनविरोध निवड
लातूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील १४० पगारदार नागरी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या लातूर जिल्हा सहकारी पतसंस्था संघाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशो
अशोक गोविंदपुरकर


लातूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील १४० पगारदार नागरी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या लातूर जिल्हा सहकारी पतसंस्था संघाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर यांच्या नेतृत्वाखाली सलग पाचव्यांदा संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी नागरी पतसंस्थांवरील पुरकर यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक व्ही. पोतंगले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अशोक

गोविंदपुरकर (लातूर तालुका), गोरख वाघमारे (बोरगाव), वैभव बोंदर (लातूर शहर व तालुका), जनक ढेकणे (पोलिस पतसंस्था, लातूर), पद्माकर वांगसकर (मुरुड), शिवराज सुगरे (लातूर), कमलाकर धुमाळ (शेडोळ, निलंगा), तानाजी पाटील (तळेगाव, देवणी), बसवराज पाटील (तोगरी, उदगीर), गोविंद हंद्राळे (शिरूर अनंतपाळ), हेमंत पाटील (महाळंगी, चाकूर), अजय पाटील (उदगीर), मंचकराव पाटील (शिरूर ताजबंद, अहमदपूर), लक्ष्मण मदरसे (हलगरा, निलंगा), श्रीशैल्य उटगे (औसा), डॉ. अनुजा जाधव (लातूर), सुभेदार प्रकाश (पेठसांगवी), नितीन स्वामी (लातूर) आणि संजय गायकवाड (अहमदपूर) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande