सोलापूर : तोडकरी वस्तीतील रस्त्याचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील रस्त्याचे भव्य उद्घाटन सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या विशेष प्रयत्नातून व
gfd


सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील रस्त्याचे भव्य उद्घाटन सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका अलका आनंद भवर यांच्या विशेष प्रयत्नातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर चिखल, खड्डे व पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेविका अलका आनंद भवर यांनी रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ करण्यावर भर दिला. रस्त्याच्या कामावर नागरिकांनी लक्ष ठेवावे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट आपल्याकडे तक्रार करावी. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भवर त्यांनी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. यावेळी राम काका भवर, राजू साखरे, सुभेदार मेजर धुळाप्पा शेंडगे, कार्तिक देडे यांच्यासह तोडकरी वस्ती व नागराज नगर परिसरातील महिला, पुरुष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे काम मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख व नगरसेविका अलका आनंद भवर यांचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande