गणेशोत्सवासाठी १२ ते २६ सप्टेंबर दरम्यान पुणे-रत्नागिरी सहा विशेष रेल्वे
पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे-रत्नागिरी दरम्यान सहा विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत या विशेष गाड्या धावणार असून, १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येण
Railway


पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे-रत्नागिरी दरम्यान सहा विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत या विशेष गाड्या धावणार असून, १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.पुणे-रत्नागिरी विशेष गाडी क्रमांक ०१४४७ ही १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी धावणार आहे. पुण्याहून ही गाडी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४४८ रत्नागिरीहून त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात दाखल होईल.याशिवाय पुणे-रत्नागिरी विशेष गाडी क्रमांक ०१४४५ ही १५ आणि २२ सप्टेंबर रोजी धावणार आहे. पुण्याहून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची रत्नागिरी-पुणे विशेष गाडी क्रमांक ०१४४६ त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात पोहोचणार आहे.या विशेष गाड्यांना चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावरडा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबे असतील. विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कावर सुरू झाले असून प्रवाशांना संगणकीकृत पीआरएस तिकीट केंद्रे तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आरक्षण करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande