इंधन दरवाढीचा फटका; स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठी वाढ झाल्याने स्टार एअरने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कंपनीकडे कारणमीम
Airport Solapur Today


सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठी वाढ झाल्याने स्टार एअरने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कंपनीकडे कारणमीमांसा मागितली होती. त्यावर स्टार एअरने वाढत्या इंधन खर्चामुळे ही सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

स्टार एअरच्या माहितीनुसार, सोलापूर-मुंबई विमानसेवेसह नांदेड-मुंबई, बेळगाव-मुंबई तसेच गुजरात आणि ओडिशामधील काही मार्गांवरील विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विमान वाहतूक क्षेत्र विविध अडचणींचा सामना करत असून, त्यात एटीएफच्या वाढत्या किमतीचा मोठा परिणाम होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये विमान इंधनाची किंमत सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होती. सप्टेंबर २०२६मध्ये ही किंमत सुमारे १२२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढली आहे. इंधनाच्या दरात झालेल्या या मोठ्या वाढीमुळे तुलनेने छोटी विमान कंपनी असलेल्या स्टार एअरवरील आर्थिक भार वाढला आहे.सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे कंपनीला दरमहा मोठे नुकसान होत असल्याचेही स्टार एअरने प्रशासनाला कळविले आहे. राज्य शासनाकडून कंपनीला विविध माध्यमातून मदत करण्यात आली असून, फंडिंग निधीत वाढ केल्यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून काढण्यास मदत झाली. मात्र, एटीएफच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सेवा सुरू ठेवणे अत्यंत कठीण झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande