माढ्याच्या शैक्षणिक विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - खा. ज्योती वाघमारे
सोलापूर, 06 सप्टेंबर, (हिं.स.)। माढा शहराच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढे माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे हायस्कूलच्या शैक्षणिक विकासासाठीही भरीव निधी उपलब्ध करून
Waghmare


सोलापूर, 06 सप्टेंबर, (हिं.स.)। माढा शहराच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढे माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे हायस्कूलच्या शैक्षणिक विकासासाठीही भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली.

माढा शिवसेना शहरप्रमुख देविदास खरात यांच्या पुढाकारातून गणपतराव साठे हायस्कूलला सदिच्छा भेट दिल्यानंतर खासदार वाघमारे बोलत होत्या.ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा आपला मानस असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.आपलेही शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेतच झाले असल्याचे नमूद करत त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. माढा येथील सहकार महर्षी गणपतराव साठे हायस्कूलच्या शैक्षणिक विकासासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande