
पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीत होणाऱ्या मोठ्या गर्दीचा विचार करून महामेट्रोने प्रवाशांच्या सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी विशेष नियोजन सुरू केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठ्या संख्येतील गणेशभक्तांना सुरक्षित आणि जलद सेवा देण्याचा महामेट्रोचा प्रयत्न असणार आहे.गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मेट्रो संचलनासोबतच प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात येत आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना कमीत कमी त्रास होऊन त्यांना सुलभपणे प्रवास करता यावा, या पद्धतीने नियोजन केले जात असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो संचलन आणि प्रवासी सुरक्षिततेचे विशेष नियोजन सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी मेट्रोकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. या नियोजनामुळे प्रवाशांना गर्दीच्या त्रासातून मुक्तता होऊन त्यांना सुलभपणे प्रवास करता येईल, या पद्धतीने आम्ही काम करत आहोत.”गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीकडे मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मेट्रो सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि सुरळीत मेट्रो संचलनावर महामेट्रोकडून विशेष भर दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु