पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ई-बोर्डिंग सुविधा सुरू
पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रस्थानाची प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, यासाठी मंगळवारपासून (ता. १) ‘ई-बोर्डिंग’ पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’च्या
Pune Air port


पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)।

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचावा आणि प्रस्थानाची प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, यासाठी मंगळवारपासून (ता. १) ‘ई-बोर्डिंग’ पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’च्या विशेष पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या सुविधेमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याची पारंपरिक पद्धत बंद करण्यात आली आहे. आता प्रवाशांना मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ई-बोर्डिंग पासच्या माध्यमातून प्रस्थानाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान इमिग्रेशनसह विविध टप्प्यांवर प्रवाशांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. या प्रक्रियेत प्रत्यक्ष कागदपत्रांची हाताळणी तसेच रांगेत लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने ई-बोर्डिंग सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेमुळे मानवी चुका टाळण्यासही मदत होणार आहे.पुणे विमानतळावरून सध्या दुबई आणि बँकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाणे होत आहेत. परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत असल्याने ई-बोर्डिंग सुविधेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रस्थान प्रक्रियेत अधिक सुलभता मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande