सोलापूरच्या वेदिका काबराला NIFTमध्ये ‘बेस्ट स्टुडंट’चा मान; सुवर्णपदकाने गौरव
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। टेक्स्टाईल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरची कन्या वेदिका आनंद काबरा हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत सोलापूरचे नाव देशभरात उंचावले आहे. नवी
सोलापूरच्या वेदिका काबराला NIFTमध्ये ‘बेस्ट स्टुडंट’चा मान; सुवर्णपदकाने गौरव


सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। टेक्स्टाईल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरची कन्या वेदिका आनंद काबरा हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत सोलापूरचे नाव देशभरात उंचावले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (NIFT)च्या दीक्षांत समारंभात वेदिकाला ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते वेदिकाला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.वेदिकाने २०२६मध्ये NIFT हैदराबाद येथून ‘फॅशन कम्युनिकेशन डिझाईन’ या शाखेत चार वर्षांची पदवी पूर्ण केली. संपूर्ण देशातील २० NIFT कॅम्पसमधील फॅशन कम्युनिकेशन शाखेच्या विद्यार्थ्यांमधून तिची ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी’ म्हणून निवड करण्यात आली.सोलापूरसारख्या शहरातून डिझाईन क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च सन्मान मिळवणे ही शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात सुवर्णपदक मिळाल्याने वेदिकाच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.वेदिकाचे हे यश केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नसून तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असल्याचे तिच्या कामगिरीवरून स्पष्ट होते. यापूर्वी तिने IITच्या डिझाईन प्रवेश परीक्षेत (CEED) संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक (AIR-2) मिळवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande