सोलापूर : तुरुंगात दिवस काढण्याची क्षमता उरली नाही; कैद्याची इच्छामरण आणि अवयवदानाची मागणी
सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। कौटुंबिक वादातून सासऱ्याची चाकूने हत्या केल्याच्या आरोपाखाली गेल्या १६ महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्याने सोलापूर सत्र न्यायालयात इच्छामरण आणि अवयवदानाची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला. मानसिकदृष्ट्
सोलापूर : तुरुंगात दिवस काढण्याची क्षमता उरली नाही; कैद्याची इच्छामरण आणि अवयवदानाची मागणी


सोलापूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। कौटुंबिक वादातून सासऱ्याची चाकूने हत्या केल्याच्या आरोपाखाली गेल्या १६ महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्याने सोलापूर सत्र न्यायालयात इच्छामरण आणि अवयवदानाची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला.

मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो असून आता तुरुंगातील दिवस काढण्याची क्षमता उरली नसल्याचे त्याने अर्जात नमूद केले. मात्र, न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावत कारागृह प्रशासनाला त्याचे तातडीने समुपदेशन करण्याचे तसेच आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.मंगेश देविदास सलगरे (३२, रा. कोळेगाव, ता. मोहोळ) असे आरोपीचे नाव आहे. सध्या या प्रकरणाची सोलापूर सत्र न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे.मंगेश सलगरे आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या वादातून दोघांनीही मोहोळ, सोलापूर तसेच कौटुंबिक न्यायालयात एकमेकांविरोधात दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल केले आहेत.या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री राम हिंगणी (ता. मोहोळ) येथे मंगेशने सासरी जाऊन सासरे बापूराव तुळशीराम माशाळ यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बापूराव माशाळ यांचा मृत्यू झाला, तर सासू आशा माशाळ आणि मेहुणा अभिषेक माशाळ हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande