पुण्यातील साउंड सिस्टिमवरील वाद कायमचा संपवा; सर्व उत्सवांसाठी समान नियम करा : वसंत मोरे
पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमच्या वापरावरील निर्बंधांवरून दरवर्षी वाद निर्माण होतो. गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाकडून नियम आणि निर्बंधांची चर्चा सुरू होते. हा वाद कायमचा संपविण्यासाठी शासनाने साउंड सिस्टिमच्या वाप
पुण्यातील साउंड सिस्टिमवरील वाद कायमचा संपवा; सर्व उत्सवांसाठी समान नियम करा : वसंत मोरे


पुणे, 06 सप्टेंबर (हिं.स.)गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमच्या वापरावरील निर्बंधांवरून दरवर्षी वाद निर्माण होतो. गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाकडून नियम आणि निर्बंधांची चर्चा सुरू होते. हा वाद कायमचा संपविण्यासाठी शासनाने साउंड सिस्टिमच्या वापराबाबत एकदाच स्पष्ट आणि कायमस्वरूपी नियमावली तयार करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहरप्रमुख वसंत मोरे यांनी केली.

साउंड सिस्टिमच्या वापराबाबत नियम ठरविताना सर्व संबंधित घटकांना सामावून घेऊन त्यावर एकमताने निर्णय घ्यावा आणि निश्चित केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी भूमिका मोरे यांनी मांडली. दरवर्षी उत्सवाच्या काळात नव्याने निर्बंधांवरून निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोरे म्हणाले, “दरवर्षी गणेशोत्सव आला की साउंड सिस्टिम किती असावी, त्यावर कोणते निर्बंध असावेत, यावरून वाद उफाळतो. हा वाद कायमचा संपविण्यासाठी शासनाने साउंड सिस्टिमच्या वापराबाबत एकदाच स्पष्ट आणि कायमस्वरूपी नियमावली तयार करावी.”हे नियम केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवता सर्व उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना समान असावेत, अशीही मागणी मोरे यांनी केली. नियमांमध्ये सातत्य आणि सर्वांसाठी समान निकष असल्यास दरवर्षी निर्माण होणारा संभ्रम आणि वाद टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande