गडचिरोली - सांदवाडीत पिकवलेला २१.८२ लाखांचा गांजा जप्त, एक आरोपी अटकेत
गडचिरोली, 07 सप्टेंबर (हिं.स.) अंमली पदार्थांचे उत्पादन घेऊन त्याची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीच्या गडचिरोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोटगुल पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत
पोलिसांनी गांजा सह जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी


गडचिरोली, 07 सप्टेंबर (हिं.स.)

अंमली पदार्थांचे उत्पादन घेऊन त्याची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीच्या गडचिरोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कोटगुल पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत घराच्या पाठीमागील सांदवाडीतून तब्बल २१ लाख ८२ हजार ६५० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अधारी धनसिंग कुवरढेरीया वय ५८ वर्ष, रा. नांगपूर, ता. कोरची, जि. गडचिरोली कारवाईत अटक करण्यात आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४३.६५३ किग्रॅ वजनाची कॅनबिस (गांजा) वनस्पतीची झाडे (बाजारभाव रु. ५०,०००/- प्रति किलोप्रमाणे एकूण रु. २१,८२,६५०/-) जप्त करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन कोटगुल येथे अ. क्र. १३/२०२६, कलम ८(क), २०(अ)(ब)(ii), २०(क) एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल.

आरोपीस १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोउपनि. विवेक वायकर पुढील तपास करत आहेत.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून छापा गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी विशेष निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर २०२६ रोजी मौजा नांगपूर येथील आरोपी अधारी कुवरढेरीया याने स्वतःच्या घरामागील सांदवाडीत विक्रीच्या उद्देशाने गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या घरामागील जागेची झडती घेतली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर गांजाची पिके आढळून आली. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.

पोलीस पथक व मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande