गणेशोत्सवाआधी सोनं झालं स्वस्त!
जळगाव, 07 सप्टेंबर (हिं.स.) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात तब्ब
गणेशोत्सवाआधी सोनं झालं स्वस्त!


जळगाव, 07 सप्टेंबर (हिं.स.) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल ६५० रुपयांची घट झाली असून, आजचा दर १ लाख ५४ हजार १५० रुपये इतका झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच आज झालेल्या घसरणीमुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः गणेशोत्सव, आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची मानली जात आहे.दरम्यान, चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून विशेष बदल झालेला नाही. चांदीचे दर जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. आज चांदीचा दर प्रति किलो २,५०,००० रुपये इतका आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली घट आणि चांदीच्या स्थिर दरामुळे सराफ बाजारातील ग्राहकांच्या हालचालींकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande