जळगावच्या व्यावसायिकाची ३.७२ कोटींची फसवणूक
जळगाव, 07 सप्टेंबर (हिं.स.) शहरातील एका मोक्याच्या व्यापारी संकुलात महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांवि
जळगावच्या व्यावसायिकाची ३.७२ कोटींची फसवणूक


जळगाव, 07 सप्टेंबर (हिं.स.) शहरातील एका मोक्याच्या व्यापारी संकुलात महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरेश नंदलाल तलरेजा (क्य ६३, रा. श्रावेल अपार्टमेंट, गणपतीनगर) हे हॉटेल व इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करतात. संशयितांनी शहरातील सिटी सव्हें क्र. २१२५/७ वरील संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने व ऑफिस विक्रीची काही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरात पाहून तलरेजा यांनी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाबाबत चौकशी केली. सुरुवातीला मनपाची परवानगी नसल्याने तलरेजा यांनी व्यवहार नाकारला होता. मात्र, आरोपींनी मनपाच्या नगररचना अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले तिसऱ्या मजल्याच्या वैध बांधकाम परवानगीचे बनावट पत्र दाखवले विश्वास संपादन केला.यानंतर तलरेजा यांनी विविध व्यवहारांतून आरोपींना ३ कोटी ७२ लाख रुपये दिले. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून कार्यालय व रीडिंग रूम सुरू केली. मात्र, मनपाकडे चौकशी केली असता तिसऱ्या मजल्याला परवानगीच नसल्याचे उघड झाले.धक्कादायक म्हणजे, तलरेजा यांच्या ताब्यातील जागा कागदपत्रांमध्ये ओपन टेरेस दाखवून मुंबईतील कंपनीच्या नावावर परस्पर विकण्यात आली. सुरेश तलरेजा यांच्या फिर्यादीवरून के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर व प्रोप्रायटर ममता अनिल साहित्या, अनिल खुबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. खुबचंद साहित्या टॉवर, मोहाडी रोड, जळगाव), जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. (ग्रँट रोड, मुंबई), विशाल रामगोपाल शर्मा (संचालक, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सावित्री ढगे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande