
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल!
नांदेड, 07 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड येथील 'जिजाऊ माँ साहेब महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. नांदेड' ची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने या सभेची सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्षा प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेचे उदघाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय कुटुंब आणि समाजाची प्रगती होणार नाही. जिजाऊ माँ साहेब क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची मोठी संधी मिळाली असून, पारदर्शक व प्रामाणिक कारभाराच्या जोरावर ही संस्था महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला येईल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून युवक प्रदेश सरचिटणीस राहुल हंबर्डे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष माधव पावडे आदींसह सर्व संचालक, संचालिका, महिला सभासद व महिला बचत गटाच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis