दिल्लीतील सत्य निकेतन दुर्घटनेप्रकरणी उपायुक्तांसह 5 अधिकारी निलंबित
नवी दिल्ली, 07 सप्टेंबर (हिं.स.) सत्य निकेतन पीजी इमारत दुर्घटनेप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कारवाई करत दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) दक्षिण विभागाच्या उपायुक्तांसह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले. या अपघातात आतापर्यंत सहा जणां
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता घटनास्थळी पाहणी करताना


नवी दिल्ली, 07 सप्टेंबर (हिं.स.) सत्य निकेतन पीजी इमारत दुर्घटनेप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कारवाई करत दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) दक्षिण विभागाच्या उपायुक्तांसह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दक्षिण उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंग, कार्यकारी अभियंता (इमारत) ललित कुमार गोयल, सहायक अभियंता (इमारत) सुनील चौहान आणि कनिष्ठ अभियंता (इमारत) आशिष कुमार यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा अपघातस्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. सुमारे 80 टक्के ढिगारा हटवण्यात आला असून, केवळ तळघराचा ढिगारा शिल्लक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. तळघर पाण्याने भरले असून पाणी साचल्याने तसेच जुन्या इमारतीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे इमारत कोसळली. आतापर्यंत 12 जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे.

दिल्लीतील पाचव्या मजल्यावरील इमारती तातडीने सील करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जवळपासच्या पीजी आणि इमारतींची सखोल तपासणी करण्याचे आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास सील करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दिल्लीकरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि निष्काळजीपणा केल्यास कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande