
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली तालुक्यातील सर्वसाधारण (GEN) प्रवर्गातील युवक-युवतींसाठी DTP (Desktop Publishing) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करताना आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, टी.सी. व बँक पासबुक यांची आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. नाव नोंदणीची अंतिम मुदत १२ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुक युवक-युवतींनी विहित मुदतीत नाव नोंदणी करून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विकास उंडाळ, कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली (मो. ८४१२०८९२७२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस-१२, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करता येईल. या प्रशिक्षणाच्या संधीचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए. एस. कदम व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis