
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ठोस मदत द्या, अशा मागणीचे निवेदन तुळजापूरच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.
तुळजापूर तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग, ऊस यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधारच हिरावला असून, पुढील काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने अनुदान व ठोस आर्थिक मदत तसेच पिण्याच्या व शेतीसाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis