“सरकार जाणून बुजून हयगय, हलगर्जीपणा करतंय, मराठ्यांचा रोष - जरांगे
छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। “सरकार जाणून बुजून हयगय, हलगर्जीपणा करत आहे. मराठ्यांचा रोष वाढत आहे. मराठा संपवण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा चालला आहे, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस
Jarange


छत्रपती संभाजीनगर, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

“सरकार जाणून बुजून हयगय, हलगर्जीपणा करत आहे. मराठ्यांचा रोष वाढत आहे. मराठा संपवण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा चालला आहे, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस होता. राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा फोन आला होते, तेव्हा या जीआरनुसार एकही मराठा वंचित राहू देणार नाही, असे फडणवीसांनी म्हटल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले.

“सरकार जाणून बुजून हयगय, हलगर्जीपणा करत आहे. मराठ्यांचा रोष वाढत आहे. मराठा संपवण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा चालला आहे. आपण सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय. सगळ्या मंत्र्यांनी सांगितले होते, तुम्हाला उपोषणाची वेळ येणार नाही म्हणून. मार्च, फेब्रुवारीला प्रसाद लाड म्हटले होते, आम्हाला बोलवा. ते म्हणाले, फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील. म्हणून लाड यांना बोलावले होते, एक वर्षात त्यांनी काही केले नाही.”, असे म्हणत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande