मुरुड पोलिसांकडून तिघांना अटक १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात मुरुड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून छोटा हत्ती वाहन, जर्सी गाय, वासरू आणि रोख रक्कम असा
पोलीस कारवाई


लातूर, 07 सप्टेंबर (हिं.स.)। मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात मुरुड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून छोटा हत्ती वाहन, जर्सी गाय, वासरू आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३०९(६), ११८(२), ११५(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींकडून पांढऱ्या रंगाचे महिंद्रा कंपनीचे एमएच-१२ एमव्ही-३८११ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन, अंदाजे किंमत १ लाख रुपये, जप्त केले.तसेच मुरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल जनावर चोरीच्या गुन्ह्यातही याच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीची काळ्या-पांढऱ्या रंगाची जर्सी गाय आणि ५ हजार रुपये किमतीचे जर्सी गाईचे वासरू, असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याशिवाय मुरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये दाखल गुन्ह्याचीही उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यात आरोपींकडून ५० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.या कारवाईत शहाजी बंकट शिंदे (वय ५०), सुनील शहाजी शिंदे (वय २१), दोघे रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव आणि नवसाजी नाना काळे (वय २५), रा. गोपाळवाडी, जि. धाराशिव यांना अटक करण्यात आली. आरोपींना अटक करण्यात आली.पोलिसांनी आरोपींकडून १ लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती वाहन, ४० हजार रुपये किमतीची जर्सी गाय, ५ हजार रुपये किमतीचे जर्सी गाईचे वासरू आणि ५० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे मुरुड पोलीस ठाण्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे, पोलीस अंमलदार बाबासाहेब खोपे, हणमंत माने, दत्ता खुमसे आणि रवि कांबळे यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande