वरुण धवनने 'हनुमान अंश'चे केले कौतुक; चित्रपटाला म्हटले खास
मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनेता वरुण धवन देखील ‘हनुमान अंश’चे कौतुक करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या विशाल चतुर्वेदी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आह
Varun Dhawan love with Hanuman Ansh film


मुंबई, 07 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनेता वरुण धवन देखील ‘हनुमान अंश’चे कौतुक करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या विशाल चतुर्वेदी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे आणि त्याची कमाई सातत्याने वाढत आहे. दरम्यान, वरुण आपल्या आई करुणा धवन यांच्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले.

वरुणने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे कौतुक करताना सांगितले की, त्याने आपल्या आईसोबत ‘हनुमान अंश’ पाहिला आणि हा त्याच्यासाठी अद्भुत अनुभव होता. त्याने प्रेक्षकांना आपल्या आई-वडिलांसोबत आणि मित्रांसोबत हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. अभिनेत्याने हेही स्पष्ट केले की, चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्याच्याशी कोणीही संपर्क साधला नव्हता, तर स्वतःच्या अनुभवानंतर त्याला या चित्रपटाबद्दल लोकांना सांगावेसे वाटले. वरुणने चित्रपटाशी संबंधित कलाकारांचे आणि विशेषतः अभिनेता शोभिनव सत्या तसेच दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांचेही कौतुक केले.

भगवान हनुमान यांच्याशी आपल्या बालपणापासून असलेल्या विशेष जिव्हाळ्याचा उल्लेख करत वरुणने सांगितले की, ‘हनुमान अंश’ हा त्याच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर एखाद्या दिव्य अनुभवासारखा आहे. त्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन हा अनुभव घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, वरुणपूर्वी कंगना रनौत, वीरेंद्र सेहवाग, दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि आदित्य धर यांनीही या चित्रपटाच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया दिली आहे. अवघ्या 2 कोटी रुपयांच्या खर्चात बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय करणे, ही बॉक्स ऑफिसवरील विशेष यश म्हणून पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande