राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाची कार्यवाही गतिमान करा -जिल्हाधिकारी
परभणी, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने विहित कालमर्यादेत राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले आहेत. या अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही अधिक गतिमान करावी,
राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाची कार्यवाही गतिमान करा -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे प्रशासनाला निर्देश


परभणी, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने विहित कालमर्यादेत राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले आहेत. या अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले. ते रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याच्या दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीस पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्यासह कार्यकारी अभियंता तृप्ती नाग, अनिस खैरदी, गणेश क्षीरसागर, सागर तायडे, अमित उबाळे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते हद्दीतील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीच्या नोटिसा बजावण्यात याव्यात. तसेच अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अतिक्रमणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यास संबंधितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या. तसेच अतिक्रमण हटविण्याच्या शासकीय कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. अतिक्रमण हटविताना वीज जोडणी काढण्याची आवश्यकता असल्यास संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कार्यवाहीत समावेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेदरम्यान संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने घटनास्थळी उपस्थित राहून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande