माढा येथे होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. उच्च न्यायालयाच्या न्यायालय स
माढा येथे होणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय


मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने माढा तालुक्यासाठी माढा येथे जिल्हा व अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सध्या या प्रस्तावित न्यायालयाची प्रकरणे बार्शी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे चालविण्यात येतात. या ठिकाणी सुमारे 2 हजार 985 दिवाणी प्रकरणे त्यापैकी माढा येथील 334 प्रकरणे आहेत. तसेच बार्शी येथील 3 हजार 224 फौजदारी प्रकरणांपैकी माढा येथील 788 प्रकरणे आहेत. ही सर्व प्रकरणे माढा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालविण्यात येतील. त्यामुळे विधिज्ञांसह, अशिल नागरिक यांना दिलासा मिळणार आहे. या न्यायालयासाठी 20 नियमित पदे व 6 बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande